स्कॅमर फक्त या ॲप्सनाच का लक्ष्य करत आहेत?
गृह मंत्रालयाच्या 2023-24 च्या वार्षिक रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार या ॲप्सद्वारे लोकांना लक्ष्य करत आहेत. कारण या प्लॅटफॉर्मवर कोट्यावधी यूझर्स आहेत आणि त्यांचा दररोज वापर करतात. हे ऑनलाइन घोटाळ्यांसाठी सोपे लक्ष्य बनवते.
BSNL ने वोडाफोन, एअरटेलला फोडला घाम, हाय स्पीड नेट आणि व्हॅलिडिटी जास्त
advertisement
WhatsAppवर सर्वाधिक स्कॅम होतात
सायबर गुन्हेगार प्रथम स्कॅम करण्यासाठी Google सर्व्हिस वापरतात. जिथून ते काही खास ऑफर्स प्रकारच्या जाहिराती सादर करतात. यानंतर, जर एखाद्या यूजरने या जाहिरातींवर क्लिक केले तर नंतर त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला जातो. येथूनच घोटाळ्याची सुरुवात होते. गृह मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत, सरकारला व्हॉट्सॲपद्वारे घोटाळ्यांचे सर्वाधिक 43,797 रिपोर्ट प्राप्त झाले. यानंतर, टेलिग्रामवर 22,680 घोटाळ्याचे रिपोर्ट आणि इंस्टाग्रामशी संबंधित 19,800 घोटाळ्याचे रिपोर्ट नोंदवले गेले.
JioCinema ने आणला फक्त 29 दिवसांचा प्लॅन, व्हॅलिडिटी 28 दिवसांची
जागतिक स्तरावरही घोटाळे वाढत आहेत
गृहमंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग आणि ऑनलाइन घोटाळे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत तर जागतिक स्तरावरही ऑनलाइन घोटाळे सातत्याने वाढत आहेत. यामध्ये घोटाळे करणारे बहुतांशी बेरोजगार तरुण, घरात राहणाऱ्या महिला आणि विद्यार्थी यांना टार्गेट करतात, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.