BSNL ने वोडाफोन, एअरटेलला फोडला घाम, हाय स्पीड नेट आणि व्हॅलिडिटी जास्त

Last Updated:

एअरटेलसारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केल्यापासून बहुतांश मोबाइल युजर्स स्वतःचा मोबाइल नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करीत आहेत.

बीएसएनएल
बीएसएनएल
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची ग्राहक संख्या झपाट्याने वाढत आहे. कंपनीने देखील आता ग्राहकांना कमी किमतीत आकर्षक प्लॅन कसे देता येतील, यावर लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत 150 दिवसांची वैधता असणाऱ्या प्लॅनचाही समावेश आहे.
जिओ, एअरटेलसारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केल्यापासून बहुतांश मोबाइल युजर्स स्वतःचा मोबाइल नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करीत आहेत. अशा युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनीने गेल्या काही काळात अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅनही लाँच केलेत. तसंच कंपनीने त्यांचं नेटवर्कदेखील सुधारलं आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता कंपनीने आणखी एक स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमुळे ग्राहकांना वैधता, मोफत कॉलिंग आणि हाय-स्पीड डेटा दररोज 3 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय.
advertisement
215 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलने 30 दिवसांच्या वैधतेसह 215 रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये 30 दिवस वैधता, दररोज 2 GB हाय स्पीड डेटा म्हणजेच महिन्याला 60 GB डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड फ्री कॉलिंग, फ्री एसएमएस आणि फ्री रोमिंगचे फायदे ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळतील.
397 रुपयांमध्ये 150 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन
बीएसएनएलनं ग्राहकांसाठी 397 रुपयांच्या रिचार्जमध्ये खूपच चांगला प्लॅन आणलाय. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 महिन्यांची वैधता मिळेल. याचाच अर्थ तुम्ही एकदा रिचार्ज केल्यानंतर 150 दिवसांची वैधता मिळेल. या शिवाय या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी संपूर्ण देशात अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि फ्री रोमिंगचा लाभ मिळेल. या प्लॅनमध्ये हाय स्पीड डेटा देखील समाविष्ट आहे. रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 30 दिवसांपर्यंत दररोज 2 GB डेटा, दररोज 100 फ्री एसएमएस मिळतील. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 दिवसांच्या वैधतेसह एक महिन्यासाठी अमर्यादित कॉलिंग, 60 GB डेटा आणि 3,000 फ्री एसएमएसचा लाभ घेता येईल.
advertisement
तुम्हीही बीएसएनएलचे सिम वापरत असाल किंवा बीएसएनएलमध्ये तुमचं सिम पोर्ट केलं असेल, तर 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही पाच महिन्यांच्या वैधतचा प्लॅन घेऊ शकतो. जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या कोणत्याही कंपनीकडे 150 दिवसांसाठी इतका स्वस्त रिचार्ज प्लॅन नाही.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNL ने वोडाफोन, एअरटेलला फोडला घाम, हाय स्पीड नेट आणि व्हॅलिडिटी जास्त
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement