TRENDING:

व्हॉट्सअ‍ॅपबाबत मोठी माहिती; ऑक्टोबरपासून होणाऱ्या बदलाने ग्राहकांवर होणार थेट परिणाम

Last Updated:

महत्त्वाची बाब म्हणजे हा अपडेट एका महिन्यातच म्हणजे 24 ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. युझर्सच्या गरजांचा विचार करून सतत नवनवे अपडेट्स देणारं अ‍ॅप अशीही व्हॉट्सअ‍ॅपची ओळख आहे. व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच चॅनेल्स सुरू केली आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅपबद्दल आणखी एक अपडेट आला आहे. काही जुन्या अँड्रॉइड फोन्सवर आता व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे हा अपडेट एका महिन्यातच म्हणजे 24 ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊ या.
व्हॉट्सअप
व्हॉट्सअप
advertisement

सध्या व्हॉट्सअ‍ॅप 4.1 किंवा त्यापेक्षा नव्या अँड्रॉइड व्हर्जन्सवर चालतं. 24 ऑक्टोबरपासून यात बदल होणार आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप केवळ अँड्रॉइड 5.0 आणि त्यावरची व्हर्जन असलेल्या फोन्सवरच चालणार आहे. त्यामुळे त्यापेक्षा जुन्या व्हर्जनच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरणं आता शक्य होणार नाही. त्यामुळे फोन अपग्रेड करण्यावाचून किंवा असलेल्या फोनचं सॉफ्टवेअर अपडेट करण्यावाचून पर्याय नाही. आताचे स्मार्टफोन्स अँड्रॉइड 13 व्हर्जनवर चालतात.

advertisement

- जुने अँड्रॉइड फोन्स व्हॉट्सअ‍ॅपची नवी फीचर्स हाताळू शकत नाहीत. तसंच जुने फोन हॅक करणं सोपं आहे.

- प्रत्येकाचं मेसेजिंग सुरळीतपणे, वेगाने आणि सुरक्षितपणे व्हायला हवं, याची खात्री व्हॉट्सअ‍ॅपला करायची आहे.

- तंत्रज्ञान सतत बदलत आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप त्यात मागे राहू इच्छित नाही.

iPhone 15: 35 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येईल नवा iPhone 15! पण हे कसं शक्य आहे?

advertisement

कोणाला काळजीचं कारण?

- ज्यांचा स्मार्टफोन खूपच जुना असेल, त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरायचं असेल तर काळजी करण्याची वेळ आली आहे.

- ज्यांनी नजीकच्या भूतकाळात स्मार्टफोन बदललेला नाही, त्यांनाही काळजी करण्याची वेळ आली आहे.

- जुनेच स्मार्टफोन वापरले जाणाऱ्या ठिकाणी राहत असलात, तर फोन अपग्रेड करण्याची गरज आहे.

भारतासाठी काय?

भारतात 48 कोटींहून अधिक व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. चॅटिंग करण्यासाठी, बिल पेमेंट करण्यासाठी, तसंच सरकारी माहिती मिळवण्यासाठीही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपने काम करणं थांबवलं, तर देशात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

advertisement

काय करणं शक्य?

- नवा स्मार्टफोन घ्या. या नव्या स्मार्टफोनची अँड्रॉइड व्हर्जन किमान 5.0 असेल असं बघा.

- जुन्या स्मार्टफोनचं सॉफ्टवेअर अपडेट करणं शक्य असेल, तर ते अपडेट करून घ्या.

- तरीही जुन्याच फोनवर काम करायचं असेल, तर व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय असलेली टेलिग्राम, सिग्नल यांसारखी अ‍ॅप्स वापरा. ती अँड्रॉइडच्या जुन्या व्हर्जन्सवरही चालतात.

advertisement

क्विक टिप्स

- तुमच्या फोनची अँड्रॉइड व्हर्जन तपासायची आहे?

- त्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. तिथे अबाउट फोन या पर्यायावर टॅप करून सॉफ्टवेअर इन्फो या पर्यायावर टॅप करा. तुम्हाला फोनची व्हर्जन कळेल.

- कोणतेही बदल करण्याआधी व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स सेव्ह करायला विसरू नका.

- नवा फोन घेत असलात, तर तो जास्त काळ टिकेल अशा व्हर्जनचा म्हणजेच शक्य तितक्या लेटेस्ट व्हर्जनचा घ्या.

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
व्हॉट्सअ‍ॅपबाबत मोठी माहिती; ऑक्टोबरपासून होणाऱ्या बदलाने ग्राहकांवर होणार थेट परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल