iPhone 15: 35 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येईल नवा iPhone 15! पण हे कसं शक्य आहे?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
दरवर्षी लोक बाजारात नवीन आयफोन मॉडेल्सची वाट पाहत असतात. यावेळी नवीन iPhone 15 मॉडेल्सही बाजारात दाखल झाले आहेत. आयफोन 15 लाइनअप कंपनीने 12 सप्टेंबर रोजी लॉन्च केला होता. सध्या आम्ही तुम्हाला 35 हजार रुपयांमध्ये नवीन iPhone 15 कसा खरेदी करायचा हे सांगणार आहोत.
नवीन iPhone 15 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रु., 256GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रु. आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 1,09,900 रु. ठेवण्यात आलीये. ते 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 15 ची विक्री सुरू झाल्यानंतर, Vijay Sales, Flipkart, Croma सारख्या विविध आउटलेट्स देखील या लेटेस्ट आयफोनवर सूट देताय. पण, 35 हजाराज नवा आयफोन घेण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक वापरावी लागेल.
advertisement
advertisement
आता तुम्हाला येथे बँक कॅशबॅक ऑफर दिसेल. यावर क्लिअर करा आणि डिटेल्स पहा. वेबसाइटनुसार, तुम्ही 48,900 रु.च्या प्रभावी किमतीत iPhone 15 खरेदी करू शकता. तुम्ही चांगल्या स्थितीतील iPhone 12, 64 GB व्हेरिएंट एक्सचेंज केलं असेल. त्याच वेळी, चांगल्या कंडीशनच्या आयफोन 13 ला एक्सचेंज करुन, ग्राहक 35 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत आयफोन 15 खरेदी करू शकता.
advertisement
सविस्तर बोलायचे झाल्यास, iPhone 15 ची किंमत 79,900 रुपये आहे आणि जर तुमच्याकडे HDFC कार्ड असेल तर तुम्हाला 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. यामुळे iPhone 15 ची प्रभावी किंमत 74,900 रुपये होईल. तर, जर तुमच्याकडे आयफोन 13 असेल तर तुम्हाला 37,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. तुम्ही तुमच्या फोनसाठी व्हॅल्यू ट्रेड इन ऑप्शनच्या आत दिलेल्या Cashify लिंकच्या माध्यमातून करु शकता.
advertisement
तुम्हाला तुमचे शहर निवडावे लागेल आणि तुमच्या फोनचे मॉडेल देखील निवडावे लागेल आणि नंतर IMEI नंबर टाकावा लागेल. जर iPhone 13 ची व्हॅल्यू 37,370 रुपयांपर्यंत असेल आणि ही रक्कम 6,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह कंबाइन केली असेल, तर तुम्हाला नवीन iPhone 15 रुपये 31,530 मध्ये मिळेल. परंतु जुना फोन चांगल्या कंडिशनमध्ये असावा.