TRENDING:

या iPhone मॉडल्सवर बंद होणार WhatsApp! पण कारणं काय?

Last Updated:

Whatsapp in old iPhones: व्हॉट्सॲप लवकरच काही आयफोन मॉडेल्सवर काम करणे बंद करणार आहे. याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Whatsapp in old iPhones: WhatsApp लवकरच काही जुन्या iPhone मॉडेल्सवर काम करणे बंद करणार आहे. एका रिपोर्टनुसार, 5 मे 2025 पासून iOS 15.1 किंवा नवीन व्हर्जन व्हॉट्सॲप चालवणे अनिवार्य असेल. याचा अर्थ असा की, जे आयफोन यूझर्स iOS 12.5.7 वर अपडेट करू शकत नाहीत त्यांना एकतर नवीन डिव्हाइस घ्यावे लागेल किंवा व्हॉट्सॲप चालवण्यासाठी त्यांचे सध्याचे डिव्हाइस बदलावे लागेल.
आयफोन
आयफोन
advertisement

कोणत्या iPhones वर होईल परिणाम?

WABetainfo च्या रिपोर्टनुसार, हा बदल फक्त त्या iPhones वर परिणाम करेल जे iOS 15.1 किंवा त्याच्या वर अपडेट करू शकत नाहीत. ज्या यूझर्सकडे आधीपासून iOS 15.1 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन आहे त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

Netflix Scam पासून सावधान! हॅकर्सची नवी खेळी तुमचं अकाउंट करेल रिकामं

advertisement

सध्या WhatsApp iOS 12 आणि त्यावरील व्हर्जनला सपोर्ट करते. परंतु आगामी अपडेटनंतर, ते फक्त iOS 15.1 किंवा नवीन व्हर्जनवर चालेल. व्हॉट्सॲपने प्रभावित यूझर्सना तयारीसाठी पाच महिन्यांची मुदत दिली आहे. या काळात ते त्यांचे डिव्हाइस अपडेट करू शकतात किंवा नवीन iOS व्हर्जनला सपोर्ट करणारा ऑप्शन निवडू शकतात.

प्रभावित आयफोन मॉडेल

रिपोर्टनुसार, iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus या बदलामुळे प्रभावित होतील. हे iPhones 10 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. त्यामुळे या मॉडेल्सवर WhatsApp चालवणाऱ्या युजर्सची संख्या खूपच कमी असण्याची अपेक्षा आहे. ज्यांच्याकडे नवीन iPhone मॉडेल्स आहेत आणि ज्याचं iOS 15.1 पेक्षा जूनं व्हर्जन आहे ते iPhone च्या Settings > General > Software Update वर जाऊन त्यांचे डिव्हाइस अपडेट करू शकतात.

advertisement

भारत सरकारचा इशारा! या 4 नंबवरुन कॉल आल्यास लगेच करा कट, अन्यथा...

व्हॉट्सॲप हे का करत आहे?

WABetainfo म्हणते की, जुन्या iPhones साठी सपोर्ट बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे iOS च्या नवीन व्हर्जनमध्ये उपलब्ध प्रगत टेक्नॉलॉजी आणि APIs वापरणे. नवीन iOS व्हर्जनमध्ये अपडेटेड फीचर्स आणि टेक्नॉलॉजी असते. जे WhatsApp ला नवीन फीचर्स विकसित करण्यात आणि त्याचे ॲप सुधारण्यात मदत करते. जुन्या व्हर्जनसाठी सपोर्ट थांबवून, WhatsApp आपल्या यूझर्सना एक चांगला अनुभव देऊ शकते आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टमशी सुसंगत नसलेली फीचर्सही लागू करू शकते.

advertisement

याशिवाय, असे मानले जाते की, व्हॉट्सॲपने जुन्या iOS व्हर्जनवर अॅक्टिव्ह यूझर्सच्या संख्येचे विश्लेषण केले असावे. डेटाच्या आधारे, हे ठरवण्यात आले आहे की खूप कमी यूझर्स जुन्या व्हर्जनवर अवलंबून आहेत. अशा प्रकारे, व्हॉट्सॲप आता नवीन iOS व्हर्जनवर लक्ष केंद्रित करू शकते आणि त्याच्या बहुतेक यूझर्सना अधिक चांगली फीचर्स प्रदान करण्यासाठी कार्य करू शकते.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
या iPhone मॉडल्सवर बंद होणार WhatsApp! पण कारणं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल