राहत्या घरातच उचलं टोकाचं पाऊल
2 जानेवारी रोजी या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नितेश खरपडे याला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार,मृत मुलगी आणि आरोपी नितेश खरपडे यांची गेल्या काही काळापासून ओळख होती. पोलिस तपासानुसार दोघांमध्ये काही वैयक्तिक कारणांवरून भांडण झाले होते. या वादामुळे मुलगी मानसिक तणावात होती असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वादानंतर काही दिवसांतच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे
advertisement
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लागू होतो का याचाही तपास सुरू आहे.
