ठाणे पोलिसांनी दिलेल्या वाहतूक नियंत्रणाच्या अधिसूचनेनुसार, घोडबंदर रोडवरील फूटपाथच्या दोन्ही बाजूला 48 मीटर लांब, 3.80 मीटर रुंद आणि 4 मीटर उंच फूट ओव्हर ब्रिज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. मुंबई आणि ठाण्याहून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व जड वाहने वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शनच्या इथेच त्यांच्यावर प्रवेश बंदी असणार आहे. मुंबई, ठाण्याहून घोडबंदर रोडकडे जाणारे सर्व जड वाहने वाय जंक्शनवरून नाशिक रोडवरून खारेगाव टोल प्लाझा, मानकोली, अंजूरफाटा मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी थेट जाऊ शकतात.
advertisement
मुंबई, ठाण्याहून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व जड वाहने कापूरबावडी जंक्शनजवळ उजवीकडे वळतील आणि कशेळी, अंजूरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. सोबतच, मुंब्रा, कळवा इथून घोडबंदर रोडकडे जाणारे सर्व जड वाहने खारेगाव टोल प्लाझा येथूनच त्यांच्यावर प्रवेश बंदी केली गेली आहे. मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व वाहने खारेगावचा बे ब्रिज, खारेगाव टोल प्लाझा, मानकोली, अंजूरफाटा मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी थेट जाऊ शकतात. नाशिकहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना माणकोली नाक्यावरच प्रवेश बंद केला जाणार आहे. नाशिकहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना माणकोली पुलाखालून उजवीकडे वळून अंजूरफाटा मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी थेट जाऊ शकणार आहेत.
