मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-नगर मार्गावर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.५१ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैभव साहेबाराव भामरे (वय २४) असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. वैभव भामरे हे नाशिक इथं राहणारे होते. कामाच्या निमित्ताने ते टिटवाळ्यात आले होते.
टिटवाळ्यातील कल्याण-अहिल्यानगर मार्गावरून जात होते. त्याचवेळी रस्त्यावर एका ठिकाणी रस्ताा ओलांडून एक दुचाकीस्वार आला. तर दुसरीकडे मुख्य मार्गावर वैभव भामरे हे डंपरच्या बाजूने येत होते. अचानक दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडून वेगाने निघून गेला.
advertisement
[video width="1600" height="900" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/titwala-1-2026-02-af4b9a82b0cdcf75d0099467be98a91d.mp4"][/video]
दुचाकीस्वाराला धडकणार अशी शक्यता वाटल्यामुळे वैभव भामरे यांनी आपली दुचाकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, याावेळी त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्याचवेळी मागून आलेला भरधाव डंपरच्या चाकाखाली वैभव भामरे सापडले. अवघ्या ५ सेकंदाच्या घडलेल्या याा घटनेत वैभव भामरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. भामरे खाली पडल्याचं पाहून समोरून गेलेल्या दुचाकीस्वाराने लगेच गााडी उभी करून धाव घेतली. स्थानिकांनी वैभव भामरे यांच्याकडे धाव घेतली. मात्र, डंपरची समोरील आणि मागील चाकं ही भामरे यांच्या अंगावरून गेली, त्यामुळे भामरे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
अंगावर शहारे आणणारी ही घटना कल्याण-अहिल्यानगर मार्गावर असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
