TRENDING:

फटाके फोडण्यास हटकलं म्हणून भाजप कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण, वाड्यातील घटना, गुन्हा दाखल

Last Updated:

या प्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये महिलांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय पटेल, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पालघर : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून विजय उमेदवारांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. पण, जल्लोष साजरा करत असताना काही ठिकाणी वाद आणि मारामारीच्या घटना घडल्या आहेत. अशातच   पालघरमधील वाड्यातील भाजपच्या उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी

महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सीएनजी गाडी समोर फटाके वाजवण्यास महिलांनी विरोध केल्याने महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.

advertisement

पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक तेजेश पाटील विजयी झाली. तेजेश पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. गावातून ही मिरवणूक सुरू होती. रस्त्यावर एका ठिकाणी सीएनजी कार उभी होती, त्यावेळी सीएनजी गाडी समोर फटाके फोडू नका, असं पीडित महिलांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. वाजविण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलाना मारहाण झाल्याची घटना वाडा शहरात सोमवारी दुपारी घडल्याचं समोर आलं आहे. या महिलांवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पालघरमधील वाडा इथं गावदेवी मंदिरजवळ ही घटना घडली. पीडित महिलेनं सांगितलं की, आमच्या बिल्डिंग समोर मंदार संदीप पाटील हा फटाके वाजवत होता. आम्ही त्याला आमच्या बिल्डिंगसमोर फटाके फोडू नको, आमची इर्टिका कार(CNG) गाडी आग लागेल, असं सांगितल्याचा त्याने मनात राग धरुन, काही तरुणांना जमवून मला शिवीगाळ केली. आरोपी संदीप अशोक पाटील, मंदार संदिप पाटील, अमेश दत्तात्रेय मोरे, उमेश दत्तात्रेय मोरे, गुरुनाथ यशवंत तरे, नंदकुमार आत्माराम पाटील आणि सुनंदा तरे यांनी आम्हाला मारहाण केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video
सर्व पहा

या प्रकरणी  वाडा पोलीस स्टेशनमध्ये महिलांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी वाडा ग्रामीण रुग्णालयात जाऊन महिलांचा जबाब नोंदवला आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जखमी महिलांनी मागणी केली आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
फटाके फोडण्यास हटकलं म्हणून भाजप कार्यकर्त्यांकडून महिलांना मारहाण, वाड्यातील घटना, गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल