एका फोन कॉलनं होत्याचं नव्हतं
तक्रारदारांच्या मोबाईलवर 11 नोव्हेंबरला राजेश कुमार चौधरी यांचा फोन आला. चौधरी यांनी स्वतःला डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियातील अधिकारी म्हणून सांगितले आणि नंतर की म्हणाले त्यांचा आधारकार्ड वापरून नाशिकमध्ये कोणीतरी मोबाईल कंपनीत सीमकार्ड घेत आहे. त्या सीमकार्डचा वापर लोकांना धमकावण्यासाठी केला जात आहे, असे सांगून त्यांनी त्यांना घाबरवले. पुढे चौधरी यांनी सांगितले की त्या आधारकार्डच्या आधारावर तक्रारदारांचे नाव वापरून कॅनरा बँकेत खाते उघडले गेले आहे आणि त्या खात्यातून दहशतवादी संघटनांशी संबंधित आर्थिक व्यवहार होत आहेत.
advertisement
फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी तक्रारदारांना फंड रेग्युलरायझेशनसाठी एकूण एक कोटी 25 लाख 50 हजार 280 रुपये विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकरणी नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात आणि नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत नोंदविलेल्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तपासात असे दिसून आले आहे की गुन्हेगारांनी सेवानिवृत्त मॅनेजर यांच्या आधारकार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, ज्यामुळे त्या व्यक्तीला केवळ आर्थिक तोटा नाही तर मानसिक धक्का देखील बसला.
