पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा मृत्यू
मकरसंक्रांतीनिमित्त विनायक सितप हे आपल्या कुटुंबासह विरार येथील बरफपाडा परिसरात नातेवाईकांकडे आले होते. सणाच्या आनंदात दुपारी विनायक सितप हे पोहण्यासाठी घराजवळील खदाणीकडे गेले. मात्र खदाणीतील पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने ते अचानक बुडू लागले.
वडिलांना पाण्यात बुडताना पाहताच त्यांची मुलगी ईकांशा हिने कोणताही विचार न करता वडिलांना वाचविण्यासाठी खदाणीत उडी घेतली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आणि पोहता न आल्याने ईकांशालाही पाण्यात अडकावे लागले. काही क्षणांतच वडील आणि मुलगी दोघेही पाण्यात बुडाले.
advertisement
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
मकरसंक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी खदाण्यांजवळ विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
