TRENDING:

Thane News: मध्यप्रदेश ते ठाणे जाळं पसरलं! मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 27.21 कोटींचा 'माल' पकडला!

Last Updated:

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये पोलिसांनी कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तब्बल 27.21 कोटी किंमतीचं मेफेड्रोन पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये पोलिसांनी कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तब्बल 27.21 कोटी किंमतीचं मेफेड्रोन पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुंब्र्यासोबतच मध्यप्रदेशातही काही ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बातमीमुळे ठाणे जिल्हा हादरला आहे. सध्या पोलिसांकडून आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा कसून चौकशी सुरू आहे.
Thane News: मध्यप्रदेश ते ठाणे जाळं पसरलं! मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 27.21 कोटींचा 'माल' पकडला!
Thane News: मध्यप्रदेश ते ठाणे जाळं पसरलं! मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 27.21 कोटींचा 'माल' पकडला!
advertisement

पोलीस उपायुक्त (झोन 1) सुभाष बुरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंब्रा पोलिस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाने एका रुग्णालयाजवळ सापळा रचत बासू उमरदीन सय्यद नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक केली. मुंब्रा पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने बासू सय्यदकडून तब्बल 23.5 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. पोलीस उपायुक्तांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आम्ही केलेल्या चौकशीमध्ये मध्यप्रदेश ते ठाणे परिसरामध्ये ड्रग्ज तस्करांचे जाळे पसरल्याची माहिती समोर आली आहे. बासू सय्यदने दिलेल्या माहितीतून पोलिसांना ड्रग्ज पुरवणाऱ्या दोघांची माहिती मिळाली आहे. राम सिंग अमर सिंग गुज्जर (40) आणि कैलास शंभूलाल बलाई (36) असे त्यांची नावं असून ते मुळचे मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत."

advertisement

मुंब्रा पोलिसांना राम सिंग गुज्जर आणि कैलास बलाईकडे 7.30 कोटींचे 3.51 किलोच मेफेड्रोन मिळाले आहे. पोलिसांनी सर्व अंमली पदार्थ आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर, मुंब्रा पोलिस ठाण्याचे एक पथक मध्य प्रदेशातील रतलाममध्ये सुद्धा कारवाई करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणाहून सुद्धा दोघांना अटक केली आहे. मनोहर लाल रंगलाल गुज्जर आणि रियाज मोहम्मद सुलतान मोहम्मद मन्सुरी उर्फ ​​राजू अशी ओळख पटवलेल्या आणखी दोन ड्रग्ज पुरवणाऱ्यांची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. "आम्ही मनोहर लाल आणि राजू यांच्याकडून 19.91 कोटी रुपये किंमतीचे 9.95 किलो मेफेड्रोन जप्त केले. अशा प्रकारे एकूण 27.21 कोटी किंमतीचे 13.629 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस स्टेशन स्तरावर ही सर्वात मोठी जप्ती आहे. मुंब्रा पोलीसांनी केलीली ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे," असे ते म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पोलीस उपायुक्तांनी पुढे सांगितले की, पाचही आरोपींवर Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act, भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत (Arms Act) पूर्वी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंब्रा पोलिस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाने जानेवारी 2024 पासून 954 कारवायांमध्ये 48.50 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: मध्यप्रदेश ते ठाणे जाळं पसरलं! मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 27.21 कोटींचा 'माल' पकडला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल