पहलगाम हल्लानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. या घटनेदरम्यान, शमीम खान यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंब्रा इथं पाकिस्तानविरुद्ध निषेध मोर्चा काढला होता. या निषेध मोर्चामध्ये माजी मंत्री आणि मुंब्रा कळवा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक सहभागी झाले होते.
advertisement
पण यावेळी शमीम खान यांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणा देत असताना "पाकिस्तान मुर्दाबाद" ऐवजी "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देत होते. ही चूक चूक लक्षात येताच त्याने लगेचच त्याची चूक सुधारली आणि "पाकिस्तान मुर्दाबाद" असे ओरडले होते. हा व्हिडिओ ८ महिन्यांचा असल्याचे सांगितला जात आहे.
हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शमीम खान यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीम खान यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
