एक चूक आणि सगळं संपलं
शनिवारी सकाळी चेतना नेहमीप्रमाणे बदलापूरहून ठाण्याच्या दिशेने लोकलने कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी सुमारे 8.10 वाजता त्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर पोहोचल्या. मात्र लोकल ट्रेन आधीच सुटत होती. घाईच्या भरात त्यांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.
मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलचा पहिला महिला डबा प्लॅटफॉर्म संपण्याच्या थोड्याच पुढे उभा असल्याने लोकलमध्ये चढताना त्यांचा तोल गेला. त्या थेट प्लॅटफॉर्मवरून रुळावर कोसळल्या. याच क्षणी लोकलचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
अवघ्या वर्षभरापूर्वीच संसार थाटला
चेतना देवरे या बदलापूर पूर्वेतील जगन्नाथ गॅलेक्सी या सोसायटीत वास्तव्यास होत्या. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्या ठाण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या आणि दररोज लोकलने प्रवास करायच्या.
घटनेच्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. मात्र लोकल सुरू झाल्यानंतर अचानक त्यांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केल्याने कोणालाही मदत करता आली नाही. एका क्षणाच्या निर्णयाने चेतनांचा रोजचा प्रवास हा शेवटचा प्रवास ठरला
