ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि बदलापूर या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. अंबरनाथमध्ये खरी लढत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. मात्र शेवटच्या क्षणाला ही युती फिस्कटल्याने शिंजेची शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेच भाजपची सत्ता आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननीत बाद करण्यात आले आहे. 29 A, 25 B, 6 B, 7A, 13 A या वॅार्डात भरलेले उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहे.
advertisement
राज्यस्तरीय नेत्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये 59 जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. आता पाच जागांवरील उमेदावरांचे अर्ज बाद झाल्याने आता भाजपला 54 जागांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मिळालेल्या या झटक्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या देखील एका उमेदवाराचा अर्ज बाद
तर दुसरीकडे शिवसेनेच्या देखील एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. 3A या वॅार्डातून शिवसेनेच्या एका उमेदवाराचा अर्ज देखील बाद करण्यात आला आहे. अंबरनाथ निवडणुकीत राजकीय उलथापालथ झाली असून उद्या अर्ज मागे घ्यायचा शेवट दिवस असल्याने उमेदवार पळवा पळविला आता सुरुवात होईल, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची 30 वर्षाची युती या निवडणुकीत तुटली आहे. अंबरनाथ नगरपालिका स्वबळावर लढत असल्याने येथील लढत चुरशीची होणार असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अंबरनाथ नगरपरिषदमध्ये महायुती आणि महाविकासआघाडीतही फूट पडली आहे. नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षानी नगराध्यक्षपदाकरिता आपले उमेदवार उभे केले असून आज उमेदवारी अर्ज भरलेही आहेत.
हे ही वाचा :
