Kolhapur Nagarpalika: मोठी बातमी! कोल्हापुरात भाजप आणि काँग्रेसची युती, एकनाथ शिंदेना पुन्हा चकवा;राजकारण तापलं
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
कोल्हापूर नगरपालिकेत चकवा देणारी युती समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे भाजप आणि काँग्रेस पक्षाची युती झाली आहे.
कोल्हापूर : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे समोर येत आहे. मात्र सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या बिनसल्याचे चित्र दिसत असताना कोल्हापुरात भाजपने मोठी खेळी केली आहे. कोल्हापूर नगरपालिकेत चकवा देणारी युती समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे भाजप आणि काँग्रेस पक्षाची युती झाली आहे.
कोल्हापुरातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. महादेव महाडिकांची ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेस गट एकत्रीतपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. आमदार राजेंद्र पाटीस यड्रावकर यांच्या विरोधात शिरोळ तालुक्यात मोट बांधली आहे. राज्यामध्ये आणखी एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला एकटे पाडण्यात आले आहे.
शिंदेची शिवसेना पुन्हा एकटी पडली?
advertisement
कोल्हापूर जिल्ह्याला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाचे राजकीय वैर माहीत आहे. शिरोळ तालुक्यात ताराराणी आघाडी म्हणजेच भाजपचे पदाधिकारी राजकारणात सक्रिय आहेत. मात्र हे दोन परस्परविरोधी गट नगरपालिका निवडणुकांमध्ये एकत्र आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते आणि काँग्रेसचे नेते जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकांमध्ये आघाडी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज अर्ज माघारीच्या काही तास अगोदर या प्रमुख नेत्यांनी बैठक घेत जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक चढवण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
advertisement
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र यड्रावकर हे महायुतीचे आमदार आहेत. मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी आणि जल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याशी असलेल्या राजकीय वैरामुळे भाजपने त्यांच्या विरोधात भुमिका घेतली आहे. काँग्रेस आणि भाजपने एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 20, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Nagarpalika: मोठी बातमी! कोल्हापुरात भाजप आणि काँग्रेसची युती, एकनाथ शिंदेना पुन्हा चकवा;राजकारण तापलं


