पीडित महिला परेरानगर परिसरात आपल्या 27 वर्षीय मुलासह राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते.त्यानंतर काही वर्षांनंतर तिचे आरोपी मनोज सैंदाणे याच्याशी अनैतिक प्रेमसंबंध जुळले. काही वर्षे या अनैतिक संबंध असताना दोघांमध्ये वाद, तणाव खास करुन पैशांवरून वाद वाढत गेले.
घटनेदिवशी नेमकं काय घडलं?
5 डिसेंबरच्या सकाळी साधारण 10 वाजता दोघांमध्ये पुन्हा एकदा पैशांवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. महिलेने खर्चासाठी मनोजकडे काही पैसे मागितले; मात्र त्याने संतप्त होऊन त्यास स्पष्ट नकार दिला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात मनोजने स्वतःवरील ताबा सुटत फरशीचा तुकडा उचलला आणि त्याने महिलेच्या डोक्यावर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली आणि जागेवरच महिलेचा मृत्यू झाला.
advertisement
हत्येनंतर आरोपी मनोजने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु वर्तकनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्याच्या हालचालींचा माग काढण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेशकुमार शिरसाठ, प्रशांत शिर्के आणि सुहास राणे यांच्या पथकाने काही तासांतच त्याला पकडले. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
