TRENDING:

Thane News: ठाण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, घोडबंदर रोडसाठी मास्टर प्लॅन, काय होणार?

Last Updated:

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: राज्य सरकारने ठाणे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल या दरम्यान सुमारे सहा किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यास अखेर मंजुरी देण्यात आली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Thane News: वाहतूक कोंडीचं टेन्शन संपणार, ठाण्यातील घोडबंदर रोडसाठी मास्टर प्लॅन तयार, काय होणार?
Thane News: वाहतूक कोंडीचं टेन्शन संपणार, ठाण्यातील घोडबंदर रोडसाठी मास्टर प्लॅन तयार, काय होणार?
advertisement

ठाण्यातील घोडबंदर मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्याचबरोबर मुंबई, वसई, विरार, मिरा रोड तसेच भाईंदर या भागांकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची संख्याही मोठी आहे. मात्र वाहनांच्या तुलनेत हा रस्ता अरुंद असून येथे अनेक वळणे तसेच चढ-उतार आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

advertisement

नवी मुंबईतून गुजरातला स्पेशल विमानसेवा, या शहरासाठी रोज उड्डाण, वेळापत्रक पाहिलं का?

या समस्येवर उपाय म्हणून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा पर्याय पूर्वी विचाराधीन होता. मात्र रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी असल्यामुळे रस्त्याचा विस्तार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पर्यायी उपाय म्हणून गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या घाट विभागात भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

या प्रकल्पाअंतर्गत गायमुख ते फाउंटन हॉटेल या सुमारे ५.५ किलोमीटरच्या अंतरात प्रत्येकी ३.५ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे उभारले जाणार आहेत. हे बोगदे सहा पदरी असणार असून वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यातून वसई, विरार, मिरा रोड आणि भाईंदरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

भुयारी मार्गाच्या निर्मितीमुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: ठाण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, घोडबंदर रोडसाठी मास्टर प्लॅन, काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल