लाखो रुपये उकळले, वारंवार मारहाण
तपासादरम्यान असं समोर आलं की, आरोपी आणि पीडिता गेल्या पाच वर्षांपासून म्हणजेच 2020 पासून एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून लाखो रुपये उकळले असून, शेवटचा व्यवहार 16 डिसेंबर 2025 रोजी झाला होता. इतकंच नाही तर, आरोपीने तिचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला वारंवार मारहाण केल्याचेही चॅट्सवरून स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या महिलेशी संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने ती प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. या सर्व छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
मानसिक आणि शारीरिक त्रास
तपासादरम्यान पीडितेच्या मोबाईलमधील चॅट्समधून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपीने तिचे काही खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती आणि तो तिला वारंवार मारहाण देखील करत होता. तिच्या शरीरावरील खुणा आणि चॅट रेकॉर्ड्सवरून तिला देण्यात आलेला मानसिक आणि शारीरिक त्रास स्पष्ट झाला आहे. या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून अखेर तिने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे उच्चशिक्षित तरुण-तरुणींमध्ये असलेल्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा कठीण परिस्थितीत तरुणांनी नैराश्याला बळी न पडता कायदेशीर मार्ग अवलंबणे गरजेचं असल्याचं आवाहन करण्यात येत आहे.
