पाणीपुरवठा का ठप्प?
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली परिसरात मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. ही गळती थांबवण्यासाठी तसेच इंदिरानगर परिसरातील संपची साफसफाई करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.
कधी अन् किती तास पाणीपुरवठा बंद?
शुक्रवार दिनांक 30 रोजी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 6 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
'या' भागातील नागरिकांनी पाणी मिळणार नाही
घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, रुपादेवी पाडा, किसननगर तसेच सावरकरनगर परिसरातील नागरिकांना ही समस्या जाणवणार आहे. या सर्व भागांमध्ये शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. या काळात काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि उपलब्ध पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.
