या कामामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.
'या' मार्गावर असेल प्रवेश बंदी
वाहतूक विभागाच्या आदेशानुसार नीलकंठ ग्रीन आणि मुल्लाबागकडून घोडबंदरकडे जाणारी तसेच ठाण्याहून मुल्लाबाग बस डेपो आणि नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने आता मुल्लाबाग बस डेपो कट येथून जाऊ शकणार नाहीत. या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
असे असतील पर्यायी मार्ग
पर्यायी मार्गानुसार मुल्लाबागकडून घोडबंदरकडे जाणारी वाहने आता हॅपी व्हॅली सर्कलमार्गे मानपाडा जंक्शनकडे वळसा घेतील आणि नंतर पुढे जाऊ शकतील. हा तात्पुरता बदल रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे.
'या' वाहनांना हा नियम लागू नसेल
दरम्यान पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन गॅस वाहने या बंदीपासून मुक्त राहतील. इतर वाहनचालकांनी मात्र नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.
नागरिकांना वाहतुकीतील या बदलांची माहिती आधीच मिळावी यासाठी संबंधित भागात फलक लावण्यात येत आहेत. तसेच पोलिस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात राहून वाहतुकीचे नियोजन सुरळीत करतील. काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी संयम बाळगावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
