शहाड उड्डाणपुल बंद झाल्याने प्रवाशांचा त्रास दुप्पट
आधीच्या पर्यायी मार्गामुळे एसटीला 12 किलोमीटरचा वळसा मारावा लागणार होता. मात्र, जवळचा पर्यायी मार्ग दिल्याने साडेपाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी 23 नोव्हेंबरपर्यंत या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दहा रुपये जास्तीचे भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे हे 20 दिवस प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसेल.
advertisement
डांबरीकरणाच्या कामासाठी पूल बंद ठेवून पर्यायी मार्ग वाहतूक शाखेने दिला होता. हा मार्ग बारवी डॅममार्गे बदलापूर, पालेगाव, नेवाळी, पलावा, डायघर- शीळ-पत्रीपूल मार्गे कल्याण असा होता. या पर्याची मार्गामुळे 12 किलोमीटरचा वळसा होता. तो आता पर्यायी मार्गामुळे वाचणार आहे. शहाड पुलाखालून वळण घेताना सर्कल, श्रीराम चौकात कोंडी होऊ शकते.
कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूककोंडी
एसटी वगळता अन्य वाहनेही बारवी डॅममार्गे जाणार असल्याने कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूककोंडीत भर पडू शकते. त्यामुळे दिलेल्या मार्गाने एसटी जाणार अहिल्यानगरला कल्याण बस डेपो प्रशासनाकडून जवळचा पर्यायी मार्ग देण्याची मागणी वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली होती. त्यावर सोमवारी उल्हासनगर वाहतूक शाखेसोबत पार पडलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.कल्याण, चक्कीनाका, विठ्ठलवाडी बस डेपो, श्रीराम चौक, साईबाबा मंदिर, शहाड पुलाखालून वळसा घेऊन एसटी बस मुरबाड आणि अहिल्यानगरला रवाना होतील.
कल्याण बस डेपोतून मुरबाडकडे 34 आणि अहिल्यानगरकडे 32 बस चालविल्या जातात अशी माहिती कल्याण बस डेपोचे व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली. कल्याण स्टेशन परिसराचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केला जात आहे. स्टेशन परिसरातून जाणारा सुभाष चौक ते बैलबाजार हा उड्डाणपुलाचे काम आणि एसटी डेपोच्या नव्या इमारतीचे काम मार्गी लावण्यासाठी एसटी डेपोतून सोडण्यात येणाऱ्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस दुर्गाडी येथून सोडण्यात येणार होत्या. त्याची डेडलाइन नोव्हेंबरपर्यंत होती.
6 नोव्हेंबरपासून दुर्गाडी येथून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस सोडल्या जाणार होत्या. शहाड उड्डाणपूल 23 नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद असल्याने दुर्गाडीहून बस सोडण्याची डेडलाइन पुन्हा लांबली. कल्याण बस डेपोतून सोडल्या जाणाऱ्या बस विठ्ठलवाडी डेपोतून सोडल्या जातील. 23 नोव्हेंबरनंतर बस वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
