
बीड : हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच रब्बी पिकांची लागवड ग्रामीण भागात जोर धरते. गहू, हरभरा, ज्वारी, मटार, मोहरी अशा पिकांचे उत्पादन या हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, तापमानातील अचानक घट, दवबिंदूंची वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे अनेकदा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.