पोलीस म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती कडक शिस्त आणि करडा चेहरा. पण छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील अधिकारी अरुण वाघ यांची ओळख काहीशी वेगळी आहे. अंगावर खाकी वर्दी असली तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात संगीताचा एक सुरेल झरा वाहतोय!