छत्रपती संभाजीनगर: प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते. आता पावसाळा सुरू आहे तर त्यामध्येही एक वेगळाच आनंद आहे. पावसाळा म्हटलं की आपण अनेक पर्यटन स्थळे फिरण्यासाठी जात असतो आणि या ठिकाणी गेल्यानंतर आपण हमखास एक पदार्थ खातो तो म्हणजे की स्वीट कॉर्न किंवा भुट्टा हा खात असतो. पण हे स्वीट कॉर्न खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तर स्वीट कॉर्न खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात? त्यातून कुठले घटक आपल्याला मिळतात? याविषयी आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती सांगितली आहे