पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता गाडे याला शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचारानंतर आरोपी शिरुर तालुक्यातील गणोट या गावी पळून गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसला होता. 70 तासांहून अधिक तास तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. पण शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दत्तात्रय गाडे या नराधमाला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आले. या संपूर्ण तपासाबाबत आणि अटकेबाबत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन अटकेचा खुलासा केला.