मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तर सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेलं.. यांच्यावरील सनावणी पूर्ण झाली असून आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी म्हटलं की, सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे, जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. असा युक्तीवाद करण्यात आलाय. दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडली सुनावली आहे. आणि आरोपींना आता पोलीस बीडला घेऊन रवाना झालेत.