वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून आता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसह मकोका लावण्यात आला आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी याची मागणी केली होती तर आता वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या अंतर्गत कारवाई केली जाणार असून कराड यांचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तावली जात आहे. खंडणी प्रकरणातून हत्या घडली होती या संदर्भात आता वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास आणखी आवळला जाणार आहे.