वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं असून कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. सरकारी वकिलांनी केज कोर्टाकडे मागणी केली असून त्याला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी जे. बी. शिंदे यांनी केली आहे. वाल्मिक कराडच्या हत्येचा सहभाग आहे काहे तपासायचं आहे, असं सरकारी वकील यांनी सांगितले. भारताबाहेर मालमत्ता आहे का हे तपासायचं आहे तर या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का हे तपासायचे आहे यासाठी 10 दिवसांची सीआयडी कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.