TRENDING:

स्वारगेटमधील अत्याचाराच्या घटनेवर पोलिसांचा खुलासा, नेमकं काय घडलं?

Last Updated: Feb 26, 2025, 13:49 IST

पुण्यातील स्वारगेट येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पुण्यातील प्रचंड गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 26 वर्षीय पीडित तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेटहून फलटणला जाण्यासाठी आली होती. यावेळी ती एकटी असल्याचा फायदा काही जणांनी घेतला. नराधमांनी शिवशाही बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पहाटे साडे पाचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिली असून नेमकं काय घडलं आणि तपास वेगाने सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
स्वारगेटमधील अत्याचाराच्या घटनेवर पोलिसांचा खुलासा, नेमकं काय घडलं?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल