बीड हत्या प्रकरणातील आरोपींची सुनावणी संपली असून दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली असून पोलीस कोठडीला आरोपींच्या वकिलाने जोरदार विरोध केला. एवढा मोठा गुन्हा करून देखील आरोपीच्या चेहऱ्यावर कुठे ही पश्चाताप दिसत नाही, त्यांनी हा गुन्हा एन्जॉय केला. त्यांच्या या संघटित गुन्हेगारी मुळे बीड जिल्ह्यात उद्योगधंदे येत नाही, वारंवार संघटीत गुन्हेगारीचा हवाला देत पोलीस कस्टडीची मागणी सरकारी वकिलांडून करण्यात आली.