TRENDING:

लहान मोठे सगळेच थिरकले या गाण्यावर, हुक स्टेप आजही व्हायरल, VIDEO

Marathi Song : 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील 'बहरला हा मधूमास नवा' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. चित्रपट हा महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनप्रवासावर आहे. हे गाणं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत हे अजय-अतुल यांनी दिले आहे. या गाण्याचे बोल गुरु ठाकुर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन हे केदार शिंदे यांनी केले आहे. अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, अश्विनी महांगडे, देवा, शुभांगी सदावर्ते यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

Last Updated: December 16, 2025, 21:17 IST
Advertisement

Marathwada Weather : मराठवाड्यात पहिल्यांदाच पडली बर्फासारखी थंडी? असं का घडलं? शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट

जालना : राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असून तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली कोसळले आहे. मराठवाड्यामधील थंडीची असलेली लाट ही सामान्य आहे की असामान्य? या थंडीचा रब्बी पिकांवर कसा परिणाम होऊ शकतो? तसेच सर्वसामान्यांनी या दिवसांत काय काळजी घ्यावी? याबद्दल कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना येथील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी लोकल 18 शी बोलताना माहिती दिली.

Last Updated: December 18, 2025, 13:01 IST

Success Story : मराठवाड्यातील 2 भावांची कमाल, 10 गुंठ्यात केली स्ट्रॉबेरी शेती, 3 महिन्यांत 2 लाख कमाई

छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज गावात दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केला आहे. प्रामुख्याने डोंगराळ आणि थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे पीक त्यांनी आपल्या शेतात फुलवले आहे. समाधान बलांडे आणि गणेश बलांडे या दोन भावांनी प्रत्येकी पाच गुंठे अशी दोघांनी मिळून दहा गुंठे क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केवळ तीन महिन्यांतच या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. येत्या काळात उत्पन्नात आणखी 2 लाखांची वाढ होईल, असा विश्वास बलांडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.

Last Updated: December 17, 2025, 20:06 IST
Advertisement

आहारात जास्त मीठ खाताय ? वेळीच व्हा सावध, हे त्वचेचे आजार सोडणार नाहीत साथ

अमरावती : हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे अनेकांना तहान कमी लागते. याच काळात लोणची, पापड, चटपटीत पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यात मीठ जास्त प्रमाणात असते. पण, आहारात जास्त मीठ घेतल्यास त्वचेला हानी पोहोचते. हिवाळ्यात आधीच हवामान कोरडे असल्याने त्वचेला इजा होते. मीठ जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते. आहारात मीठ जास्त घेतल्यास त्वचेच्या कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊया.

Last Updated: December 17, 2025, 19:04 IST

Success Story : आयटीतील नोकरी सोडली, आता आनंद विकतायत पोहे, महिन्याला 3 लाखांची उलाढाल

पुणे

पुणे: आयटी क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव, लाखो पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आनंद अभ्यंकर यांनी कांदे पोह्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आहे. विप्रो कंपनीत ते मॅनेजर होते. पण स्वतःच काहीतरी करायचं या इच्छेतून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सध्या त्यांच्या ‘कांदे पोहे आणि बरंच काही’ या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याला तब्बल 3 लाखांची उलाढाल होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

Last Updated: December 17, 2025, 18:35 IST
Advertisement

7 ते 8 दिवस खोकला राहतो, ताप येतो, पुण्यात नव्या आजाराचं थैमान, डॅाक्टरांचा अलर्ट

पुणे

पुणे: पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत आहे, धूर, धूळ आणि सूक्ष्मकानांच्या वाढत्या प्रमाणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे मायकोप्लाजमा निमोनिया जिवाणूमुळे वॉकिंग निमोनियाचा संसर्ग नागरिकांमध्ये आढळून येतोय. याबद्दलची अधिक माहिती डॉ.अविनाश भोंडवे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: December 17, 2025, 17:39 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
लहान मोठे सगळेच थिरकले या गाण्यावर, हुक स्टेप आजही व्हायरल, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल