
मुंबई: दादरमधील 'फूड्स माफिया' या फूड स्टॉलवर आपल्याला एक चविष्ट आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले बटर चिकन पाव आणि विविध स्वादिष्ट फूड्सची चव चाखायला मिळते. मुंबईमध्ये पहिला बटर चिकन पाव यांनीच विकण्यास सुरुवात केली. या स्टॉलवर 30 रुपयांमध्ये बटर चिकन पाव मिळतो ज्यामध्ये ताजं चिकन आणि मऊ पाव तुम्हाला मिळतो. तसेच स्पेशल बटर चिकन पावमध्ये सॉस, चाट, चिकन स्टिक, आणि ताजं सलाड यांचा समावेश असतो आणि याची किंमत 50 रूपये इतकी आहे.
Last Updated: December 08, 2025, 17:39 ISTसोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी गावात राहणाऱ्या दोन मित्रांनी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाला चार्जिंगवर चालणारे वाहन बनवले आहे. संकेत जाधव आणि समाधान शेवाळे दोघे राहणार लोणारवाडी, असे पेट्रोल आणि चार्जिंगवर चालणारी दुचाकी वाहन बनवणाऱ्या तरुणाचे नाव आहेत. या संदर्भात अधिक माहिती संकेत जाधव यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
Last Updated: December 08, 2025, 17:14 ISTभिन्न संस्कृतीचं शहर असलेल्या सोलापूरमधील खाद्य संस्कृतीमध्येही विविधता आहे. सोलापूरमधील अनेक पदार्थ राज्यात फेमस आहेत. मटण खारीबोटी हासोलापुरी पदार्थही नॉनव्हेजप्रेमींमध्ये चांगलाच फेमस आहे. ही डिश कशी बनते ते पाहूया
Last Updated: December 08, 2025, 16:25 ISTआपल्या श्वानांना स्वच्छ ठेवावे ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी बाजारामध्ये महागडे शाम्पू आणि साबण हे उपलब्ध आहेत. हे प्रॉडक्ट बाजारामध्ये महाग भेटतात आणि ते प्रत्येकाला घेणे परवडत नाहीत. यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील श्वानतज्ञ डॉक्टर डॉ.अनिल दाभेकर उपाय सांगितले आहेत.
Last Updated: December 08, 2025, 14:53 ISTपुणे : ऊसतोड कामगाराच्या मुलाची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. बीडच्या गांधनवाडी येथील शंकर इथापे याचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं काम करत आहे. बारामतीजवळील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शंकरचं कुटुंब गेल्या 18 वर्षांपासून ऊसतोडणीसाठी येत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 08, 2025, 14:10 IST