
सध्याच्या काळात दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी उत्तम हेल्दी नाश्ता करणे गरजेचे झाले आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात पौष्टिक आणि विविध कडधान्य युक्त असलेला नाश्ता आपल्या आहारातून गायब होत आहे. नव्या पिढीला गावाकडे बनवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ माहितीच नाहीत.
Last Updated: December 04, 2025, 15:01 ISTपुणे : आवड असेल आणि करण्याची जिद्द असेल तर कोणतेही क्षेत्र छोटे नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुळशीबाग मार्केट परिसरातील अस्सल कोल्हापुरी पायताण या दुकानाचा तरुण उद्योजक मंजुनाथ भिसुरे. उच्च शिक्षित असूनही पारंपरिक व्यवसायाला नवा चेहरा देण्याचा निर्णय घेतलेल्या मंजुनाथने आज कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला चांगल्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या दुकानातील विविधता, गुणवत्ता आणि परंपरेचा वारसा यामुळे दररोज मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होत आहेत.
Last Updated: December 04, 2025, 14:33 ISTनाशिक : उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता, नाशिकच्या दोन वर्गमैत्रिणींनी व्यवसायाला प्राधान्य देत एक नवा आदर्श घालून दिला आहे. सायली आव्हाड आणि दिव्या गुंजाळ या दोघी तरुणींनी स्वतःचा सँडविच पॉइंट सुरू करून महिन्याकाठी लाखभराची कमाई करत आहेत. इतरांच्या हाताखाली काम करण्याऐवजी, इतरांना नोकरी देण्याचं स्वप्न घेऊन त्या यशस्वी उद्योजिका म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत.
Last Updated: December 04, 2025, 14:09 ISTछत्रपती संभाजीनगर: कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरू केले आहे. त्यात शेती विषयक, हवामानासंदर्भात माहिती, पीकविषयी सल्ला, पिकांना द्याव्या लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज आणि कीडरोगांविषयी माहितीसह बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. महाविस्तार ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आला आहे. या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेती कामात निश्चित मदत होणार आहे.
Last Updated: December 04, 2025, 13:25 ISTपुणे: महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. या दिवसांत अनेकांची तक्रार असते की शरीरावर सूज येते, अंगदुखी जाणवते. यामागचे कारण म्हणजे याकाळात थंड वाऱ्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या भागात रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे त्वचा लालसर होणे, सूज येणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी अनेक जण घरगुती उपाय म्हणून आग, चूल किंवा हीटरला हात-पाय सरळ लावून उष्णता देण्याचा प्रयत्न करतात पण हे उपाय शरीराला हानिकारक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. कृत्तिका अग्रवाल यांनी लोकल 18 ला सविस्तर माहिती दिली आहे.
Last Updated: December 04, 2025, 13:03 IST