
नाशिक : आजच्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणारी एक कहाणी नाशिकमधून समोर आली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या आणि काही वर्षे नोकरी केलेल्या सक्लिन मिर्झा या तरुणाने वेळेवर आणि अपेक्षित प्रगती होत नसल्याचे पाहून हातची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडिलांनी सुरू केलेला राज मिसळचा व्यवसाय पुढे नेऊन सक्लिनने आज एक मोठे यश संपादन केले आहे.