TRENDING:

नाशिकमध्ये मिळतंय अस्सल कोकणी सी-फूड! आईच्या हाताच्या चवीने मोरे बंधूंचं नशीब पालटलं; महिन्याची कमाई ऐकून व्हाल थक्क

Food

नाशिक - नाशिकच्या 2 भावांनी मिळून आपल्या आईच्या हाताचे जेवण नाशिकमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक इच्छा त्यांच्या आईकडे मांडली होती आणि आज मॉम्स कोकण कट्टा ह्या रेस्टोरंटच्या माध्यमातून ती पूर्ण सुद्धा झाली आहे. प्रवीण मोरे आणि आनंद मोरे हे दोन्ही भाऊ आणि आई आज नाशिकमध्ये हे हॉटेल चालवत आहे. तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 5 ते 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहेत. नेमकं त्यांनी हे यश कसं मिळवलं, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.

Last Updated: Dec 29, 2025, 15:56 IST
Advertisement

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला कानमंत्र नेमका काय ? VIDEO

ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे." असा संदेश राज ठाकरेंनी मेळाव्यात दिला.

Last Updated: Dec 29, 2025, 17:56 IST

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि अकाली वृद्धत्व? महागड्या क्रीम्स नको, फक्त 'ही' एक सवय बदला; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

बीड

बीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणे ही अनेकांची सवय बनली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, टीव्ही, ऑनलाइन काम किंवा मानसिक ताणतणाव यामुळे झोपेची नैसर्गिक वेळ मागे पडत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम केवळ थकव्यापुरते मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर होत आहे. वेळेवर आणि पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील जैविक घड्याळ बिघडते आणि विविध आजारांची शक्यता वाढते, असे बीड येथील आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ सांगतात.

Last Updated: Dec 29, 2025, 17:45 IST
Advertisement

समस्या सांगितल्या, राजकीय पक्षनेत्यांना झोडलं, घाटकोपरच्या नागरिकांनी कोण जिंकणार सांगितलं, VIDEO

मुंबईमध्ये महापिलिका निवडणुक जवळ आली आहे. त्यातच आता न्यूज 18 च्या 'बघतोय रिक्षावाला' या शो मध्ये मुंबईकरांनी आपली व्यथा मांडली आहे. महापालिकेत कोण बाजी मारणार ? याचा कल यावरुन समजतो.

Last Updated: Dec 29, 2025, 17:20 IST

सावधान! महिलांमध्ये वेगाने वाढतोय 'टाईप २' मधुमेह! मोबाईलचा अतिवापर पडतोय महागात; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

छत्रपती संभाजीनगर : सध्या अनेकजणांना मधुमेहाचा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी मधुमेह हा ज्येष्ठ लोकांना व्हायचा. मात्र, आता याचे प्रमाण हे महिला, तरुण, पुरुषांमध्येही दिसून येत आहे. वयाच्या 40 मध्ये किंवा त्यापेक्षा पण अगदी लहान वयामध्ये मधुमेहाचा आजार हा सर्वांना गाठत आहे. टाईप टू मधुमेहाचा विचार केला असता महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे अशा महिलांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, काय आहार घ्यावा, याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

Last Updated: Dec 29, 2025, 17:03 IST
Advertisement

सांगली शिराळ्या तालुक्यात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, VIDEO

सांगली शिराळा तालुक्यात बिबट्याने दहशत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मुक्या प्राण्यांवर ते हल्ले करत आहेत. ऊसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झाले आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 16:59 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
नाशिकमध्ये मिळतंय अस्सल कोकणी सी-फूड! आईच्या हाताच्या चवीने मोरे बंधूंचं नशीब पालटलं; महिन्याची कमाई ऐकून व्हाल थक्क
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल