
काहीतरी झणझणीत चमचमीत खाण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात विदर्भातील मंडळी म्हटलं की मराठा पाटवडी आलीच. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होते. तिखट तर्रीच्या रस्स्यात ही स्पेशल मराठा पाटवडी अप्रतिम लागते. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता. काहीतरी नवीन भाजी खाण्याची इच्छा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा. वर्धायेथील गृहिणी मीना शिंदे यांच्याकडून मराठा पाटवडीची खास रेसिपी जाणून घेऊयात.