
बटाटा वडा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. वर्ध्यातया बटाटा वड्याला 'आलू बोंडा' असं देखील म्हणतात. त्यात वर्ध्यातील भोगेच्या आलुबोंड्याची चवच न्यारी असून हा बटाटा वडा खवय्यांना भुरळ घालतोय. तब्बल 50 ते 60 वर्षांपूर्वी केशवराव सिताराम भोगे यांनी संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी या व्यवसायाची सुरुवात केली होती. आता भोगेचा आलू बोंडा आणि मूंग वडा या नावाने पदार्थ प्रसिद्ध आहेत.