
मुंबई : मुंबईमध्ये अनेक खाऊगल्ली आहेत. या खाऊगल्लींमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ केवळ खाण्यासाठी नाही, तर त्यांच्या चवीमुळे आणि तयार करण्याच्या पद्धतीमुळे वर्षानुवर्षे ओळखले जातात. अशाच खाऊगल्लींपैकी एक म्हणजे भुलेश्वरमधील खाऊगल्ली. भुलेश्वर मार्केट आणि मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या अगदी बाहेरच ही खाऊगल्ली लागते. इथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात आणि त्यामधील एक कायम चर्चेत असलेला पदार्थ म्हणजे खिचा पापड.