TRENDING:

अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल

Food

मुंबई : मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत कोकणाची माती, सुगंध आणि परंपरा जपणारे एक ठिकाण आजही दादरमध्ये अविरत उभे आहे. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ गजानन साळवी काका आपल्या छोट्याशा स्टॉलमधून मुंबईकरांना कोकणाची अस्सल चव चाखवत आहेत. बदलत्या काळात कितीही आधुनिक खाद्यसंस्कृती आली तरी साळवी काकांच्या स्टॉलसमोर उभे राहिल्यावर घरगुती कोकणी चवीचा मोह टाळणे अशक्यच ठरते.

Last Updated: December 03, 2025, 14:04 IST
Advertisement

नंदीच्या कानात का सांगतात गाऱ्हाणं? यामुळे महादेव होतात प्रसन्न

नंदी हे भगवान शंकर यांचं वाहन आहे. तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात गेलात की तिथं नंदीची मूर्ती नक्की आढळते. 'मी जिथं बसेन तिथं तू ही असशील', असं वरदान शंकरानंच नंदीला दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती आढळते. शिवमंदिरात गेल्यावर अनेक जण शिवाची पूजा करण्याबरोबरच नंदीची पूजाही करतात. त्याचवेळी आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानात सांगण्याची पद्धत आहे. नंदीच्या कानात ही इच्छा का सांगावी? त्याचबरोबर ती सांगण्याची काय पद्धत आहे? याबाबत पुण्यातल्या विद्याधर काळे गुरुजी यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: December 03, 2025, 17:02 IST

प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ थालीपीठ कसं बनवायचं? पाहा गावाकडची रेसिपी

Food

थालपीठ हा पश्चिम भारत आणि उत्तर कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. परंतु लोणी आणि दह्याबरोबर छान लागते. बीडमधीलगृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.

Last Updated: December 03, 2025, 16:32 IST
Advertisement

Dhapate Recipe : नाश्त्याला काय? मराठवाडा स्टाईल दही-धपाटे बेस्ट पर्याय, पाहा अगदी सोपी रेसिपी

Food

जालना: सकाळी नाश्त्यासाठी नवीन काय करावे? असा प्रश्न बऱ्याचदा गृहिणींना पडत असतो. तुम्हाला देखील असा प्रश्न पडत असेल तर मराठवाडा स्टाईलने तयार केलेली दही धपाटे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दही धपाटे कसे तयार केले जातात? त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? हेच आपण जालना येथील गंगासागर लहू पडघणकर यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: December 03, 2025, 16:04 IST

वास्तूशांतीनंतरही घरात कटकटी होत आहेत? ‘हा’ उपाय करताच होईल सर्व टेन्शन दूर

पुणे

पुणे, : आपल्या घरात शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. बऱ्याचदा सर्व सोयीसुविधा असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. या अडचणीत कसा मार्ग काढावा यावर पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी टिप्स दिल्या आहेत. कशा टाळणार घरातील कटकटी? ‘वास्तू शास्त्रानुसार, ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतीशील ऊर्जा निर्माण होते. घरातील मंदिरासाठी हे आदर्श स्थान आहे. ईशान्य दिशा भगवान कुबेर नियंत्रित करते. ते भगवान शिवाचं स्थान आहे. घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा नसावा. घरामध्ये जर सतत वाद विवाद होत असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चप्पल स्टॅन्ड , कचऱ्याचा डब्बा ठेवू नये, ईशान्य कोपऱ्यात शौचालयासंबंधी वस्तू ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि संपत्तीचा ऱ्हास होतो,’ असे जोशी यांनी सांगितले

Last Updated: December 03, 2025, 15:36 IST
Advertisement

तब्बल 558 पुरुषांनी संपवलं जीवन, चक्रावून टाकणारं कारण, पुण्यातून आली धक्कादायक आकडेवारी समोर

पुणे

पुणे : आर्थिक ताण, कौटुंबिक कलह, सततची स्पर्धा आणि मानसिक दडपणाचा वाढता बोजा… या सर्वांचा परिणाम पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर स्वरूपात होत असल्याचे चिंताजनक चित्र पुण्यात समोर आले आहे. गेल्या चार वर्षांत तब्बल 558 पुरुषांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार समोर आली आहे. एकूण 710 स्त्री-पुरुषांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपवली असून त्यापैकी 78 टक्के केसेस पुरुषांच्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी मागवलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.

Last Updated: December 03, 2025, 14:51 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल