
पुणे: महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. या दिवसांत अनेकांची तक्रार असते की शरीरावर सूज येते, अंगदुखी जाणवते. यामागचे कारण म्हणजे याकाळात थंड वाऱ्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या भागात रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे त्वचा लालसर होणे, सूज येणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी अनेक जण घरगुती उपाय म्हणून आग, चूल किंवा हीटरला हात-पाय सरळ लावून उष्णता देण्याचा प्रयत्न करतात पण हे उपाय शरीराला हानिकारक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. कृत्तिका अग्रवाल यांनी लोकल 18 ला सविस्तर माहिती दिली आहे.