
मनुका आणि दूध या दोन्हीमध्ये भरपूर पोषकतत्व असतात. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 भरपूर प्रमाणात असते. याशिवाय मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि के देखील असते. तर मनुकात खूप जास्त प्रमाणात लोह आढळते. त्यात तांबे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील असतात. त्यामुळे दुध आणि मनुका यांचा एकत्र आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत.