शिवाजी गोरे, प्रतिनिधी खेड : रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. खेड तालुक्यातील साखलोळी भागात डोंगराची माती खाली आली आहे. डोंगर खचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे दृश्यं अतिशय भयंकर आहे. डोंगर खचताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूर्णच्या पूर्ण डोंगर खचून माती आणि दगडाचे ढीग खाली आले आहेत.