मालवण : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्याठिकाणी बसवण्यासाठी दुसरा अश्वारुढ पुतळा शिवप्रेमी घेऊन आले होते. मात्र प्रशासनाने पुतळा माघारी पाठवला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा यांनी पुतळा आणला होता. पण सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी बंदोबस्तात हा पुतळा कोल्हापूरपर्यंत सोडला. जोपर्यंत राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात नाही तोपर्यंत आम्ही आणलेला अश्वारूढ पुतळा बसवा अशी मागणी त्यंनी केली होती.