
कोल्हापूर : जगभरात सर्वात जुन्या मोटरसायकल ब्रँड्स पैकी एक असणाऱ्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकल कंपनीला भारतीयांनी नेहमीच पसंती दिली आहे. आजपर्यंत या ब्रँडने मोटरसायकल विश्वात बऱ्याच प्रसिद्ध आणि रुबाबदार गाड्या मोटरसायकल प्रेमींना दिल्या. यातीलच एक म्हणजे रॉयल एनफिल्डची सुपर बाईक कॉन्स्टिलेशन 700 होय. रॉयल एनफिल्डची ही पहिली सुपर बाईक एका कोल्हापूरकराकडं असून याबाबत आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.