
निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. उल्हासनगरमध्ये सुभाषटेकडी परिसरात एक बॅग भरुन पैसे घेऊन जात होते.तेव्हा अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी पाठलाग करत ही रिक्षा पकडली. त्यानंतर पोलीसात त्या तरुणांना नेण्यात आले. हे पैसे भाजपने दिल्याचे प्राथमिक माहिती मिळाली.
Last Updated: Jan 13, 2026, 18:58 ISTठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यात सगळ्यांचं लक्ष हे पालिकेत पुन्हा कोण येणार यावर आहे. त्यातच आता ठाकरे बंधूंची प्रचाराची रणनीती नेमकी काय आहे ? हा विरोधकांना पडलेला प्रश्न. ठाकरे बंधूंनी आपआपल्या पक्षाच्या शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांना उत्साह , जोश दिला आहे.
Last Updated: Jan 13, 2026, 20:39 ISTया महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळालं. अनेकजण जखमी झाले तर कुणी रुग्नालयात दाखल झाले. तर काही ठिकाणी सभेत खूप गोंधळ झाला.
Last Updated: Jan 13, 2026, 20:06 ISTनिवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये २.५ लाखांची रोकड जप्त केली आहे. आचारसंहितेचे भंग केल्या प्रकरणी एका भाजपचा कार्यकर्त्याला पोलीस आणि निवडणुक पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच कारवाई केली आहे.
Last Updated: Jan 13, 2026, 19:48 ISTया महापालिकेच्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओचा पॅटर्न पाहायला मिळाला. सुरुवात राज ठाकरेंनी आपल्या जाहिर सभेत केली होती. त्यानंतर शिवाजीपार्क मध्ये शेवटच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा पॅटर्न वापरला.
Last Updated: Jan 13, 2026, 19:32 ISTएकीकडे अनेक ठिकाणी पैशांचं वाटप सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Last Updated: Jan 13, 2026, 19:12 IST