
वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, "युती झाली तरी महानगर पालिकेची प्रचार हा हायपर लोकलाइज व्हायला पाहिजे, शिवाजीपार्कवर सभा घेतली लाखोंची हजारोंची, पण शिवाजी पार्कवर किती वॉर्डची लोकं असतात. लाखोंची सभा घेऊन काय होणार आहे. त्यापेक्षा वॉर्डात जाऊन प्रचार करणं हे महत्वाचं आहे. "
Last Updated: Jan 13, 2026, 17:19 ISTचंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने चक्क गौतमी पाटीलला मैदानात उतरवलं आहे! प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात हजेरी लावत 'पंजाचं बटन दाबण्याचे' आवाहन केले. विजय वडेट्टीवारांच्या कौतुकापासून ते विरोधकांच्या टीकेला दिलेल्या उत्तरापर्यंत, गौतमीच्या या वादळी भाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय म्हणाली गौतमी? सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा!
Last Updated: Jan 13, 2026, 16:30 ISTपिंपरी मधून उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलताना महेश लांडगेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "यांना उमेदवारी मी दिली. मी नगरसेवक बनवलं. अरे काय होतास तु काय झालास तु. भंगारच्या गाड्या इकडून तिकडून पोहोचवायचा. या शहराला तळहाताप्रमाणे वाढवलं आहे. हे सगळं आता पाहून तळपायाची आग मस्तकात जाते."
Last Updated: Jan 13, 2026, 16:28 ISTउबाठाचे आमदार नितिन देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटावर आरोप केला आहे. ते म्हणाले, "काही ठिकाणी मशाल चिन्ह आमचं असं शिंदे गटांने सांगितलं आहे. एका आज्जी म्हणाली त्यांना की, शिवसेनेची निशाणी तु धनुष्यबाण सांगतो. त्या धनुष्यबाणाचं आयुष्य हे कोंबडी एवढं आहे. फडणवीसांना वाटलं की चिकण बिर्याणी खायची आहे तर कोंबडीचे आयुष्य संपून जाईल."
Last Updated: Jan 13, 2026, 15:55 ISTआज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यात आता नागपुरमध्ये सीएम देवेंद्र फडणवीसांनी बाईक रॅली काढली आहे. तेव्हा त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.
Last Updated: Jan 13, 2026, 15:27 IST