
धुळ्यातील शिरपूरच्या वाघाडी रस्त्यावर थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. एका ट्रॅक्टरने रिक्षेला जोरदार धडक दिली. तेव्हा बोअरवेलचा पाईफ थेट रिक्षेच्या आरपार घुसला.त्यामुळे रिक्षेचा चक्काचूर झाला असून त्यातील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. ४-५ जण प्रवासी जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.