
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला ३० दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून समुद्रात रखडलेली रशियाची अवाढव्य तेल जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत.अमेरिकेने परवानगी दिल्यावर भारत रशियाकडून तेल घेणार. त्यामुळे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत म्हटले, गुलाम राष्ट्रांना अशी परवानगी दिली जाते.अमेरिकेच्या मेहरबानीवर आपण रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थू तुमच्या जिंदगाणीवर. असं टीकास्र सरकारवर सोडलं आहे.