हिवाळा सुरू झाला की, त्वचा कोरडी होते. त्यांनंतर विविध समस्या जाणवायला लागतात. जसे की, त्वचेला खाज येणे. बारीक पुरळ येणे, त्वचा काळी पडणे अशावेळी आपण लगेच घरगुती उपाय सुरू करतो. त्यात सर्वात आधी येतं ते म्हणजे त्वचेला स्क्रब करणे. बाहेरील प्रॉडक्ट आणून किंवा घरगुती साहित्य वापरून आपण स्क्रब करतो. पण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्याला स्क्रब करणे हे नेहमी चुकीचे आहे. यामुळं त्वचेला काहीही फायदा होत नाही. त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते